top of page

Marathi Articles, 2022 - Grade 6

माझे दुसरे घर

किमया नांबियार [६ फ]


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई-वडिलांबरोबर शाळा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला माणूस घडवण्यात शाळेचा मोठा वाटा असतो.

माझ्या शाळेचे नाव बॉम्बे स्कॉटिश असून ती वीर सावरकर मार्ग, माहिम येथे आहे. माझी शाळेची सुसज्ज भव्य इमारत असून ती १७५ वर्ष जूनी आहे. माझ्या शाळेत शिशुवर्ग ते १२वी पर्यंतचे वर्ग आहेत. माझ्या शाळेत मोठी प्रयोगशाळा, मोठे वाचनालय, संगीत वर्ग, कला कक्ष, संगणक कार्यशाळा व आम्हाला खेळण्यासाठी सर्व खेळाच्या साहित्याने युक्त असलेले मोठे मैदान आहे.

शाळेतील सर्व शिक्षक त्यांचा विषय काही खेळ, प्रकल्पावर आधारित आम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगतात व सर्वच विषय शिकण्यासाठी मनोरंजक बनवतात. शाळेत जिम्नॅस्टिक्स, फूटबॉल, क्रिकेट, नृत्य, गायन, संगीत, हस्तकला, चित्रकला अशा अनेक कला व खेळ शिकवले जातात. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत व विभिन्न स्पर्धा आयोजित केल्या जातात .

माझी शाळा व शिक्षकही खूप चांगले आहेत जे आम्हाला तळमळीने शिकवतात. देशाला मदत करणारी महत्वाची व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देतात, म्हणून मला माझी शाळा खूप आवडते.


Recent Posts

See All

‘एकतेमध्ये खूप ताकद असते’ हे विधान खूप प्रसिद्ध आहे. हे अगदी खरं आहे, असं मला वाटतं. माणूस जे एकटा करू शकत नाही ते अनेक माणसं एकत्र...

पैसा आपले आयुष्य बदलू शकतो का? आजच्या जगात प्रत्येक व्यक्ती पैशामागे धावत असते. काही लोक तर म्हणतात की पैसाच जीवन आहे. आपण पैशाशिवाय जगू...

आईची पर्स एका जादूगारापेक्षा कमी नाही आहे, जादूगाराच्या खिश्यातून काय निघेल ते सांगता येत नाही, कधी साप, कधी ससा अशा अचंबित करणार्‍या...

bottom of page